Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी आश्लेषा बागडे होणार यशवंत श्री पुरस्काराने सन्मानित

0 3 9 0 4 0

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी आश्लेषा बागडे होणार यशवंत श्री पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १०/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आश्लेषा बागडे हिने कुस्ती स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. आश्लेषा हिस यशवंत श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यशवंत श्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र, ५१,००० रुपये असे आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा १२ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी होणार आहे. विलासराव घुमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा विजयश्री सभागृहात सकाळी १०.०० वा संपन्न होणार आहे असे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांनी माहिती दिली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे