Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा आणि लसूण विषयावर 17 व्या राष्ट्रीय वार्षिक बैठकीचे आयोजन

0 7 9 8 0 4

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा आणि लसूण विषयावर 17 व्या राष्ट्रीय वार्षिक बैठकीचे आयोजन*

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात दि. 12-13 मे, 2026 रोजी कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. सुधाकर पांडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे, राजगुरुनगर जि. पुणे येथील कांदा-लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राम दत्ता, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. एस. बोडके आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांच्यासह देशातील विविध 14 राज्यातील 70 पेक्षा जास्त कांदा-लसूण पिकांतील नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
ही दोन दिवसीय बैठक प्रामुख्याने गेल्या वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी वर्षाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत विविध विभागातील शास्त्रज्ञ प्रायोगिक चाचण्यांचे निष्कर्ष सादर करतील आणि भारताची उत्पादकता जागतिक स्तरावर नेण्यासाठी धोरणे निश्चित करतील. या दोन दिवसांत विविध तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये नवीन वाण संशोधन व प्रसारण हे तांत्रिक सत्र विशेष महत्त्वाचे आहे. तसेच या बैठकीत विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात येणार आहे. संशोधनातून उत्पादकता वाढवण्यासाठी तांत्रिक उपाय शोधणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये हवामान बदलांना तोंड देणार्या स्मार्ट जनुकीय वाणांचा विकास, जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि कांदा बीजोत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. या तांत्रिक सत्रांमुळे प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, ज्यामुळे भारतीय कृषि क्षेत्र अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यास चालना मिळेल. या बैठकीमध्ये संशोधनाची देवाण घेवाण होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे