Breaking
ब्रेकिंग

शहरातील गुन्हेगारीवर ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण

पोलिस प्रशासन विशेष नियंत्रण कक्ष उभारणार - पो.नि. दत्तात्रय निकम

0 3 9 0 4 2

शहरातील गुन्हेगारीवर ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण

पोलिस प्रशासन विशेष नियंत्रण कक्ष उभारणार –
पो.नि. दत्तात्रय निकम

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शहरातील पोलिसांचा डोळा म्हणून काम करणाऱ्या ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता पोलीस स्टेशन मधून होणार आहे. त्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.
अमळनेर शहरात मुख्य चौकात तसेच विविध रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रत्येक भागात काही कॅमेरे मिळून एखाद्याच्या घरी किंवा दुकानावर डिव्हीआर लावलेला होता. परंतु अनेकदा वाहन चोरी , चेन स्नॅचिंग सारख्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. कधी कॅमेरे बंद , कधी डिव्हीआर खराब यामुळे गुन्ह्याच्या शोधात विलंब होत होता. आणि नागरिकही खराब झालेल्या कॅमेरे दुरुस्तीसाठी एकदा योगदान दिल्याने पुन्हा धजावत नाहीत.
त्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी चर्चा केली. शहरातून गावाबाहेर असलेल्या तीन चार किमी अंतरापर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली. सर्व कॅमेरे पोलीस स्टेशनच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. पोलीस स्टेशनच्या नियंत्रण कक्षात बसून सर्व ठिकाणचे फुटेज पाहता येतील व मिळवता येतील. त्यामुळे पोलिसांचे काम गतिमान होणार आहे. त्याच प्रमाणे यापुढे सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाल्यास त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च पोलिसांमार्फत केला जाणार आहे.

शहरात एखादी घटना घडल्यास तक्रार येईपर्यंत आणि फुटेज पाहण्यापर्यंत गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होत होते. आता यापुढे पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्ष असल्याने तेथूनच गुन्हेगार कोणत्या दिशेला गेला हे समजेल आणी तातडीने तपास यंत्रणा कामाला लावता येणार आहे.-दत्तात्रय निकम ,पोलीस निरीक्षक अमळनेर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे