Breaking
ब्रेकिंग

५ जुन रोजी राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा

कार्यशाळेस पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे: प्रमोददादा मोरे

0 3 9 0 3 6

५ जुन रोजी राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा

कार्यशाळेस पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे: प्रमोददादा मोरे

राहुरी तालुका जावेद शेख

महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या अथक प्रयत्नातून अनेक वर्षापासून दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्ताने कार्यशाळा अथवा पर्यावरण स्नेही मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी गुरुवार दि. ५ जून २०२५ रोजी स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत राज्याचे वन्यजीव विकास महामंडळाचे सदस्य पद्मश्री चैत्रामजी पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यशाळेस महाराष्ट्र प्रदूषण निवारण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकूडझोडे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, डब्ल्यू. ई. चांगुलपणाची ओळखचे संस्थापक राज देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यशाळेत मंडळातील पर्यावरण व वृक्षसंवर्धनाप्रती केलेल्या विशेष कार्याच्या प्रित्यर्थ नांदेड येथील जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे व यवतमाळ येथील अविनाश रोकडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेस मंडळातील व राज्यातील पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, सचिव वनश्रीताई मोरे-गुणवरे, कार्याध्यक्ष छायाताई रजपूत, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ आदींनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे