श्रीरामपूरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्ती चित्र प्रदर्शन
जिल्ह्यात प्रथमच महिला विषयक मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

श्रीरामपूरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्ती चित्र प्रदर्शन
जिल्ह्यात प्रथमच महिला विषयक मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन
राहुरी वृत्तसेवा : जावेद शेख
केंद्रीय संचार ब्युरो माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अहिल्यानगर व इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती श्रीरामपूर आदींच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूरात आज गुरुवार दिनांक ६ मार्च ते ८ मार्च अखेर महिला शक्ती मधुमाध्यम चित्र प्रदर्शनाचे आयोजन श्रीरामपूर नगर परिषदेचे आगाशे सभागृह व आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालय, मेन रोड येथे सकाळी १०.००ते रात्री ८.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर मध्ये प्रथमच भव्य दिव्य प्रदर्शन संपन्न होत आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात तिरंगा थाळी, पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर तसेच विविध प्रकारचे स्टॉल व महिलांना यशस्वीरित्या पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. महिलाविषयक प्रदर्शनामध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित भारतीय महिलांची माहिती, भारतातील महिला स्वातंत्र्य सैनिक, संरक्षण दलामध्ये महिलांची भूमिका, महिला शक्ती नव्या भारताची दिशादर्शक, भारतातील यशस्वी ग्रामीण महिला उद्योजक, भारतातील यशस्वी महिला विज्ञान शास्त्रज्ञ आदींची सखोल माहिती चित्ररूपाने मल्टीमीडियाद्वारे देण्यात आलेली आहे.
तरी सदरच्या प्रदर्शनाचा सर्व विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, महिला मंडळ, विविध सामाजिक संस्था, सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रिय अधिकारी फनी कुमार, क्षेत्रिय प्रचारक शिल्पा पोफळे, प्रांताधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष किरण सावंत पाटील, तहसीलदार तथा उपाध्यक्ष रेड क्रॉस सोसायटी मिलिंद कुमार वाघ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, बाल विकास प्रकल्पाधिकारी शोभाताई शिंदे, सचिव रेड क्रॉस सोसायटी सुनील साळवे आदींनी केली आहे.