पत्रकार : समाजाचा आरसा

*पत्रकार : समाजाचा आरसा*
====================
*अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी – प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर*
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. आरसा जसे आहे तसे दाखवतो, तसाच पत्रकाराने समाजात जे घडते ते जसेच्या तसे मांडले पाहिजे. गावात रस्ता तुटला असेल, पाणी मिळत नसेल, शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल, मजुराला मजुरी मिळत नसेल, किंवा कुठे अन्याय झाला असेल, तर ते लोकांपर्यंत पोहोचवणे हेच पत्रकाराचे काम आहे. पत्रकार हा फक्त बातमी लिहिणारा नसतो, तो समाजाचा आवाज असतो. जिथे अन्याय होतो, तिथे प्रश्न विचारणे हीच पत्रकाराची जबाबदारी आहे. आज मोबाईलमुळे प्रत्येकजण बातमी देतो, पण सत्य तपासून, कोणाच्याही दबावाला न घाबरता बातमी देणारा तोच खरा पत्रकार असतो. अफवा पसरवणे हे पत्रकारितेचे काम नाही, सत्य पोहोचवणे हेच काम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराने नेहमी निष्पक्ष राहिले पाहिजे. लेखणी कोणासाठीही विकली जाऊ नये, ती फक्त जनतेसाठी चालली पाहिजे. प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर हे उच्च शिक्षित आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी 33 वर्षे प्रामाणिक सेवा केली. सोबत गेली 27 वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. पण आपण पत्रकार आहोत, हे त्यांनी कधीही स्वतःच्या तोंडून सांगितले नाही. फोकसमध्ये येणे किंवा स्वतःबद्दल बोलणे त्यांना आवडत नाही. कामातूनच लोकांनी ओळखावे, हीच त्यांची भूमिका आहे. पत्रकार जर जागा असेल तरच समाज जागा राहतो. म्हणून आरसा स्वच्छ असेल तरच समाजाचे खरे रूप दिसते, आणि लेखणी प्रामाणिक असेल तरच लोकशाही जिवंत राहते.



