SAVE THE WORLD” या मोहिमेअंतर्गत अमळनेर येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे जगभरातील नेत्यांना भावनिक आवाहन*
मानवतेच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी विनाशकारी शस्त्रांचा वापर थांबविण्याचे आवाहन :- श्री. प्रशांत निकम आणि श्री. संदीप घोरपडे*

*SAVE THE WORLD” या मोहिमेअंतर्गत अमळनेर येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे जगभरातील नेत्यांना भावनिक आवाहन*
*मानवतेच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी विनाशकारी शस्त्रांचा वापर थांबविण्याचे आवाहन :- श्री. प्रशांत निकम आणि श्री. संदीप घोरपडे*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- दिनांक: २३ जून २०२५ स्थान: अमळनेर, जिल्हा जळगाव “SAVE THE WORLD” या मोहिमेअंतर्गत अमळनेर येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे जगभरातील नेत्यांना भावनिक आवाहन
अमळनेर येथील दोन सामाजिक कार्यकर्ते, श्री. प्रशांत निकम आणि श्री. संदीप घोरपडे यांनी जागतिक शांततेसाठी एक अनोखी आणि प्रेरणादायी पावले उचलली आहेत. “SAVE THE WORLD” या नावाने त्यांनी जगभरातील प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांना थेट ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे. या पत्रांमध्ये त्यांनी वाढत्या युद्धजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, मानवतेच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी विनाशकारी शस्त्रांचा वापर थांबविण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यकर्त्यांनी पत्रे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशिया, चीन, इराण, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन व युक्रेनसह अनेक देशांच्या प्रमुखांना त्यांच्या अधिकृत ईमेलवर पाठवली आहेत. या पत्रांमध्ये त्यांनी शांती, प्रेम, आणि परस्पर सन्मानाने जगण्यासाठी आवाहन करत, भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण आणि पृथ्वीचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे ठामपणे मांडले आहे.
त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश जागतिक नेत्यांचे लक्ष युद्ध आणि विनाशाकडे वळणाऱ्या प्रवृत्तीकडे वेधण्याचा असून, मानवतेच्या हितासाठी शांततेचा मार्ग स्वीकारावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.या प्रयत्नाबद्दल अमळनेर शहरात तसेच जिल्हाभरातून कौतुक होत असून, सामाजिक चळवळींमध्ये हा एक अभिनव आणि सकारात्मक पाऊल ठरत आहे.