Breaking
ब्रेकिंग

पदोन्नतीबद्दल पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा ‘स्नेहबंध’तर्फे सत्कार

0 7 6 9 4 7

पदोन्नतीबद्दल पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा ‘स्नेहबंध’तर्फे सत्कार

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

अहिल्यानगर /   जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलिस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन सन्मान केला. पोलिस परेड मैदानावर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी मेजर जनरल विक्रम वर्मा, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद आदी उपस्थित होते. राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर भारतीय पोलिस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात आली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजवला. नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे