Breaking
ब्रेकिंग

*प्रा.डॉ.विनय जोशी याना “समाजरत्न” पुरस्कार

*१३ जून रोजी त्यांचा "आंबट शौकीन" हा चित्रपट अमळनेर सह सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

0 3 9 0 3 0

*प्रा.डॉ.विनय जोशी याना “समाजरत्न” पुरस्कार*

*१३ जून रोजी त्यांचा “आंबट शौकीन” हा चित्रपट अमळनेर सह सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : धुळे येथील रियल इंडो ग्लोबल व्हीजन सोशियल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा नॅशनल “समाजरत्न” अवार्ड अमळनेर  येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्रसिद्ध सिने अभिनेते प्रा.विनय पुरूषोत्तम जोशी यांना  धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील सभागृहात प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ प्रमोद पवार व प्रेसिडेंट डॉ मनोहर पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
         डॉ जोशी यांना शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.प्रताप महाविद्यालयात ते कार्यरत असताना त्यांनी आपले अध्यापन कार्य सांभाळून क्रीडा व सांस्कृतिक विभागात मोठे योगदान दिले.अनेक नाटक त्यांनी बसवून विद्यार्थ्यांमधून कलाकार घडविले.दर्जेदार अशी नाटके ती असल्याने मानाचे पारितोषिक देखील त्या नाटकांना मिळाले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून त्यांनी मराठी सिनेमात अभिनय करून एक उत्कृष्ठ अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे.यासाठी आतापर्यंत चार पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी भोंगा चित्रपटात त्यांनी मौलाना व डॉक्टर असे दोन अभिनय केले होते यासाठी त्यांना नॅशनल अवार्ड प्राप्त झाला आहे.चपला या बेस्ट सिनेमा साठी देखील त्यांना पुणे फेस्टिव्हल मध्ये ट्रॉफी आणि मेडल मिळाले असून चपला या ५५  मिनिटाच्या शॉर्ट फिल्म चे लेखक,डायरेक्टर व प्रोड्युसर स्वतः डॉ जोशी हे आहेत. याशिवाय केतकीच्या कुटुंबाचे लेखक,डायरेक्टर व प्रोड्युसर देखील तेच आहेत.आतापर्यंत त्यांनी भूमिका केलेले. हलाल,भोंगा,प्रणय मास्तर,,फास,आतुर,रे राया कर धावा,रत्नाकर,फफुटा आदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता येत्या १३ जून रोजी त्यांचा “आंबट शौकीन” हा चित्रपट अमळनेर सह सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.याशिवाय इतर चित्रपटही त्यांचे भविष्यात येणार असल्याने यानिमित्ताने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे