Breaking
ब्रेकिंग

‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार प्रदान

पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान

0 3 9 0 4 8

स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार प्रदान

पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

अहिल्यानगर : स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्य हस्ते महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावेडी येथील माऊली सभागृहात ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्डचे वितरण करण्यात आले. डॉ. उद्धव शिंदे यांनी स्नेहबंध फौंडेशनच्या माध्यमातून  सामाजिक जाण आणि आपण काय देणं लागतो याची जाण मनात ठेवून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यावर काम केले.  त्यांनी निराधार, वंचित, बेघरांना कपडे, जेवण दिले, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेतले. त्यांच्या मनात कायम समाजसेवेची ओढ कायम असते, आता ही ओढ म्हणण्यापेक्षा ती त्यांचा पिंडच झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कवयित्री सरोज आल्हाट, स्पर्श संस्थेचे खजिनदार अमोल आल्हाट, स्पर्शच्या अध्यक्ष शीतल साळवे, ज्ञानरचना फौंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, प्रवीण साळवे, सारिका शेलार आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

डॉ. शिंदे यांनी अनाथ, निराधारांच्या आयुष्यात भरले आनंदाचे रंग 

 डॉ. उद्धव शिंदे आतापर्यंत अनेक अनाथ, निराधारांच्या आयुष्यात विविध भेटवस्तू, सणवाराला मिष्टान्न भोजन देऊन आनंदाचे रंग भरले आहेत. डॉ. शिंदे यांच्या सामाजिक कामांची यादी भलीमोठी आहे. विशेष म्हणजे नि:स्वार्थ मनाने केलेले ते काम आहे, म्हणून त्यांचे काम दैदिप्यमान आणि कौतुकास्पद आहे. राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला, अशी प्रतिक्रिया ‘मारुतीराव मिसळवाले’चे संचालक अमित  खामकर  यांनी दिली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे