दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ मा. रश्मी दीदी बागल यांच्या शेटफळ (ना) येथील महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ मा. रश्मी दीदी बागल यांच्या शेटफळ (ना) येथील महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
एकत्र येऊया, मजबूत होऊया
करमाळ्याच्या विकासासाठी दिग्विजय भैय्यांना विजयी करुया!
करमाळा: दि. १७/ एकत्र येऊया मजबूत होऊया करमाळ्याच्या विकासासाठी दिग्विजय भैय्यांना विजयी करुया! अशा घोषणा देत शेटफळ (ना) येथे घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना – महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारार्थ मा. रश्मी दीदी बागल (प्रदेश उपाध्यक्षा, भाजपा महाराष्ट्र) यांनी शेटफळ (ना) येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शक्तिप्रदर्शन केले. शेटफळ गावात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला आज उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. रश्मी दीदींनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी दिग्विजय बागल यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दिग्विजय बागल हे केवळ शिवसेना महायुतीचे उमेदवार नसून, सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले जातील. महिलांच्या सहभागाशिवाय कोणताही विकास शक्य नाही हे देखील अधोरेखित केले. या मेळाव्या दरम्यान महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे महिलांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झालेला पहायला मिळत आहे. यावेळी उपस्थित महिलांनी सरकारचे आभार मानले.
आजच्या या संवादातून गावातील महिला वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, दिग्विजय भैय्या बागल यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्याच अनुषंगे येणाऱ्या २० तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना – महायुतीला विजयी करून आपला आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी महिला वर्गाला केले.