Breaking
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त शिंगणापूर फाटा येथे चौक फलकाचे अनावरण

0 3 9 0 4 0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त शिंगणापूर फाटा येथे चौक फलकाचे अनावरण

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील शिंगणापूर फाटा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने नामांकित चौकातील फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या फलकाचे अनावरण धनगर समाजाचे नेते श्री. विजुभाऊ तमनर, माजी सरपंच भानुदास तमनर सर, व्यापारी अनिल भिसे, पोपट शेंडगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनीही चौकास भेट देत फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या. काही वर्षांपूर्वी या चौकाचे नामकरण झाले होते. आजच्या विशेष दिनाचे औचित्य साधून फलकाचे नव्याने उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शरद बाचकर, सुनील भिसे, उपसरपंच लहानु तमनर, रमेश खेमनर, रविंद्र भिसे, शशागर माने (मनसे तालुकाध्यक्ष), शुभम व मयूर बोरकर, आदित्य जानकर, अजय बाचकर, कुंदन बाचकर, महेश मंचरे, सचिन ढोणे, सतीश लबडे, सोनू शेटे, लहू धनवटे, रवी तमनर, अखिल पठाण, योगेश पिसाळ, बापू होडगर, सोन्याबापू बाचकर, जितेंद्र माने, रोहित तमनर, महेंद्र तमनर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद बाचकर व सुनील भिसे यांनी पुढील वर्षी 31 मे रोजी याच ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे