अमळनेर शहरातील जी एस हायस्कुल मध्ये रथसप्तमी साजरा
अमळनेर शहरातील जी एस हायस्कुल मध्ये रथसप्तमी साजरा
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर: खा.शि.मं.संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल मध्ये रथसप्तमी निमित्ताने सुर्य देवतांचे पुजन व सुर्यमंत्र करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील , उपमुख्याध्यापक ए डि भदाणे ,पंतजली योग तंज्ञ व योग गुरु गजाजन माळी , के पी पाटील , पर्यवेक्षक एस आर शिंगाणे , , पर्यवेक्षक सी एस सोनजे , शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ , ह्यां मान्यवंराच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.योग गुरु श्री गजानन माळी यांनी सुर्य मंत्र विद्यार्थ्यांकडून म्हणुन बारा स्टेप्स मध्ये सुर्यनमस्कार करुन घेतले.त्यानंतर योगा व सुर्यनमस्कार चे महत्व , आरोग्याचे महत्व , व्यायामाचे महत्व , सध्या भारतात होणारे आजार यांच्यावर मात करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम दररोज करावा असे मार्गदर्शन केले.
यावेळी आर एन सांळुखे , एस आर अहिरे , क्रीडा विभागाचे जे व्ही बाविस्कर , उमाकांत हिरे , एच एस चौधरी , एल सी बंजारा ,, क्रीडा विभागाचे प्रमुख व शिक्षक प्रतीनीधी एस पी वाघ सरांनी सुत्रसंचलन केले व आभार जे व्ही बाविस्कर यांनी मानले.