भिवरवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून अडीच एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारले: 11 लाख रुपयांचे नुकसान
भिवरवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून अडीच एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारले: 11 लाख रुपयांचे नुकसान
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथे अज्ञात इसमाने परिपक्व झालेल्या केळीच्या बागेत तणनाशक फळावरून सुमारे अकरा लाख रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथील परमेश्वर सुभाष पाबळे वय 40 यांनी करमाळा पोलिसात दिली आहे. हा प्रकार 12 ते 13 नोव्हेंबर च्या दरम्यान घडला आहे.
फिर्यादी पाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गट न. ४ मध्ये पाबले यांच्या शेतातील अडीच एकर बागेवर औषध फवारणीसाठी ते वैभव पाबळे गेले होते. यावेळी केळीच्या घड चमकत असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता त्या घडावर निळे द्रव दिसून आले. त्याला वास व दर्प येत होता. दुपारनंतर सदरचे घड सुकून व काळे पडत गेले. त्यामुळे या ठिकाणी तणनाशक मारल्याचे स्पष्ट झाले. तणनाशक फवारल्याने केळी काळी पडल्याने दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झालेचे स्पष्ट झाले. याचा कृषी अधिकारी केतन सरडे यांनी पंचनामा केला. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात तणनाशक औषध फवारल्याने करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून याचा तपास हवालदार ठेंबरे हे करत आहेत.