भाजपा मध्य मंडलच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन निमित्त अभिवादन
भाजपा मध्य मंडलच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन निमित्त अभिवादन
प्रतिनिधी : संवेद वायकर
भाजपा मध्य मंडल अहिल्यानगर च्या वतीने लालटाकी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी अध्यक्ष मयूर बोचूघोळ, सुहास पाथरकर, सुनील तावरे, डॉ .दर्शन करमाळकर, अनिल निकम, सुनील सकट, उत्कर्ष गिते आदि उपस्थित होते .
अध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी स्मृती दिनानिमित्त बोलताना सांगितले कि, तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२०— १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखले जातात . ते एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (अस्पृश्य) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले असे मयुर बोचुघोळ यांनी सांगितले .



