अहिल्यानगर च्या महिलांना छावा चित्रपट पहायला मिळणार तोही मोफत
अहिल्यानगर च्या महिलांना छावा चित्रपट पहायला मिळणार तोही मोफत
आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा उल्लेखनीय उपक्रम
प्रतिनिधी : आसावरी वायकर
छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातुन महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी अहिल्यानगर मधील महिलांसाठी बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत .
सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा. हे शोज दि. १७ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी ३:३० वाजता) असणार आहेत.
मोफत तिकीट मिळवण्यासाठी
संपर्क : वैभव ढाकणे
मोबाईल : 9710132222
वेळ : सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंतमोफत तिकीट मिळवण्यासाठी ठिकाण : आमदार संग्राम अरुणकाका जगताप – जनसंपर्क कार्यालय, हॉटेल राजयोग शेजारी, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा .