सतखेडा येथे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमात नवलसिंग राजे यांचा सत्कार*
प्रतापभाऊ पाटील यांच्याकडून 15 हजार रुपयांचे बक्षीस आणि 130 टी-शर्टचे वाटप*
*सतखेडा येथे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमात नवलसिंग राजे यांचा सत्कार*
*प्रतापभाऊ पाटील यांच्याकडून 15 हजार रुपयांचे बक्षीस आणि 130 टी-शर्टचे वाटप*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
सतखेडा : गावातील ऐक्य आणि सणासुदीचा उत्साह जपणारा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम यंदाही मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माननीय पालकमंत्री साहेबांचे सहायक नवलसिंग राजे उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार कैलास दिलीप पाटील यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील, शेतीसंचे चेअरमन गजानन बापू तसेच सबखेडा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच किरण पाटील यांनीही हजेरी लावली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
प्रतापभाऊ पाटील यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना ‘‘‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा गावाच्या एकतेचे प्रतीक आहे. कोणत्याही प्रकारचे भांडण तंटे न होता गावकरी एकत्र येऊन उत्साहात सण साजरा करतात, ही बाब अभिमानास्पद आहे. ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी,’’ असे आवाहन केले.
उपक्रमाला हातभार म्हणून प्रतापभाऊ पाटील यांनी माननीय पालकमंत्री साहेबांच्या वतीने गणेश मंडळाला 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याशिवाय 130 गणेश मंडळाच्या नावाचे टी-शर्ट वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.



