जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ वृंदावन कॉलनी सटाणा येथे वृक्षारोपण संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ वृंदावन कॉलनी सटाणा येथे वृक्षारोपण संपन्न
प्रतिनिधी : सोनाली मोरे
सटाणा : ६ / ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ वृंदावन कॉलनी, सटाणा येथे अत्यंत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मुख्याधिकारी ज्योती भगत, उपनगराध्यक्ष सुमित वाघ ,नगरसेवक राहुल पाटील, मंगेश खैरनार आणि समाजसेविका सोनाली मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिनाचा संदेश दिला .

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आपल्या परिसराला हरित बनवण्यासाठी सर्व कॉलनीवासी यांच्यासोबतीने हा छोटासा प्रयत्न करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी उपस्थित सटाणा नगरपरिषद मा. मुख्याधिकारी ज्योती भगत मॅडम, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक राहुल पाटील, नगरसेवक मंगेश खैरनार सनपा, बी के पाटील सर, समस्त नागरिक वृंदावन कॉलनी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलनीतील जागरूक महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ण केला.केवळ झाडे लावणे हे ध्येय नसून लावलेल्या रोपट्यांचे उत्तम संगोपन करून ‘आपलं वृंदावन’ खऱ्या अर्थाने सुंदर आणि संपन्न करण्याचा आमचा निश्चय आहे .
“झाडे लावा, झाडे जगवा…
वसुंधरेला संपन्न बनवा!”
सोनाली मोरे (वसुंधरा मित्र)
(नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत )


