Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग पुनर्वसन समितीवर रत्नाकर ठाणगे यांची निवड

0 8 6 5 1 2

दिव्यांग पुनर्वसन समितीवर रत्नाकर ठाणगे यांची निवड

जिल्हाधिकारी यांनी केली नियुक्ती

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

दिव्यांगासाठीच्या अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन समिती वरती अशासकीय सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व पुनर्वसनाचे कार्य केले जाणार आहे.
दिव्यांगाच्या कल्याणासाठी निर्धारित केलेल्या 5% निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे व दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी योजनेची कार्यक्रमाची अंमलबजावणी व दिव्यांगाच्या अधिनियमातील तरतुदीची जिल्हा प्रशासनाद्वारे अंमलबजावणी योग्य होते की नाही? यावर समिती लक्ष ठेवून दिव्यांगाच्या विकासासाठी काम करत आहे. सदर समितीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी ठाणगे अहिल्यानगर जिल्हा रेल्वे सल्लागार समितीवर यांची नियुक्ती झालेली होती. या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मा खा.सुजय दादा विखे पाटील , शहराचे आमदार संग्राम जगताप, नगर पारनेर विधानसभा चे आमदार काशिनाथ दाते सर , प्रहार दिव्यांग शेळके प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण पोकळे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी रत्नाकर ठाणगे यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे