Breaking
ब्रेकिंग

हिवरगाव पावसा येथे देवगड देवस्थानचे शाकंभरी यात्रा उत्सवाचे आयोजन

0 3 9 0 2 7

हिवरगाव पावसा येथे देवगड देवस्थानचे शाकंभरी यात्रा उत्सवाचे आयोजन

संगमनेर / प्रतिनिधी : नितीनचंद्र भालेराव 

संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा यांनी षौष पौर्णिमेच्या निमित्त शांकभरी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार
दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी पाच ते सहा वा.श्रींचे मंगल स्नान, सकाळी सहा ते सात वाजता पालखी सजावट,सकाळी सात ते नऊ वाजता देवाची काठी व पालखी संवाद्य मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा,सकाळी 9.15 वा.भाविक भक्तांच्या उपस्थितीत महापूजा व महाआरती संपन्न होईल.

सदर यात्रा उत्सवास तालुक्यातील खंडोबा भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे सर,उपाध्यक्ष पांडुरंग गडाख,सचिव मोठ्या भाऊ बडे,खजिनदार चंद्रशेखर गडाख विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तम जाधव,यादवराव पावसे यांच्यासह सर्व विश्वस्त तसेच सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे आणि ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे