Breaking
ब्रेकिंग

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे कडून त्यांना मिळालेला पुरस्कार पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे टीम वर्क ला व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व अहिल्यानगर जिल्ह्यातील सकारात्मक पत्रकारितेला समर्पित

0 7 9 7 8 7

*पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे कडून त्यांना मिळालेला पुरस्कार पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे टीम वर्क ला व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व अहिल्यानगर जिल्ह्यातील सकारात्मक पत्रकारितेला समर्पित*

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक पुण्यनगरी अहिल्या नगर जिल्हा यांच्या मार्फतीने देण्यात येणारा द हिरोज ऑफ अहिल्यानगर सन 2026 चा पुरस्कार यांना आज दिनांक 24/05/2026 रोजी शिर्डी येथे देण्यात येणार आहे.
ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून तब्बल 109 मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. या कार्याची दखल घेऊन पुण्यनगरी या वृत्तसमूहाणे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश व बीजमाता व पदमश्री राहिबाई पेरे यांचे हस्ते शिर्डी येथे प्रदान केला जाणार आहे.
सदरचा पुरस्कार,राकेश ओला साहेब, सोमनाथ घार्गे साहेब, मुम्मका सुदर्शन साहेब
अप्पर पोलिस अधीक्षक श्री वैभव कलूबर्मे,श्री सोमनाथ वाघचौरे साहेब,डॉ. बसवराज शिवपुजे साहेब,जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शन, राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी- अंमलदार यांचे टीमवर्क तसेच राहुरी तालुका कलाकार मंच , स्नेहालय संस्था अहिल्यानगर, केअर संस्था पुणे यांनी जनजागृती साठी घेतलेला पुढाकार व राहुरी तालुक्यातील शालेय शिक्षक व शिक्षण विभाग तसेच राहुरी तालुक्यातील पोलीस पाटील यांना मिळालेला पुरस्कार समर्पित केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे