Breaking
ब्रेकिंग

अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात पुस्तक दिनाचा कार्यक्रम

0 4 3 2 6 5

अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात पुस्तक दिनाचा कार्यक्रम

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात जागतिक पुस्तक दिन, वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पार्लरच्या संचालिका दर्शना पवार व मुख्याध्यापक सुनील पाटील होते.मुख्याध्यापक पाटील यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. पवार यांनी मुलांना मुखपृष्ठ, मलपृष्ठ, प्रस्तावना, पुस्तक छपाई याविषयीची माहिती दिली. पुस्तके वाचून सारांश लेखन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. घोरपडे यांनी पुस्तके वाचली तर चांगली व्यक्तिमत्व समजतील. त्यांनी केलेल्या कार्य व सत्कृत्य समाजापर्यंत पोहोचेल, असे सांगितले. डी. ए. धनगर यांनी झाडे लावून जगविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले.विलास चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्या पाटील, देवेंद्र पाटील, समाधान पाटील, मुस्ताक शेख, ग्रंथपाल मुकेश पाटील, शुभम निकम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 2 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे