Breaking
ब्रेकिंग

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची हमी देणारास पाठिंबा देईल-सुरेशराव लांबे पाटील

0 7 9 7 8 9

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची हमी देणारास पाठिंबा देईल-सुरेशराव लांबे पाटील

राहुरी तालुका /  जावेद शेख .

राहुरी तालुक्यातील भौगोलिकपरिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात नंबर एकची असताना या तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ,ते प्रश्न सोडवण्यासाठी मी मागील काळात विविध आंदोलने केली,सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले.तरीही आम्ही सर्व सामान्य शेतकऱ्यांची साथ कधीच सोडली नाही. तेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मि ही पोट निवडणुक लढवत आहे, हे प्रश्न सोडविण्याची हमी जो उमेदवार देईल त्याला मी जाहीर पाठिंबा देईल असे मत माध्यमांशी बोलताना अपक्ष उमेदवार शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना लांबे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाचा पाडा वाचताना ग्रामीण रुग्णालय इमारत व डॉक्टर,विविध उच्च शिक्षण सुविधा,ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे लाईट बिल आकारणी युनिट प्रमाणे असल्या मुळे योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे त्या योजनांना हॉर्स पॉवर (एचपी) प्रमाणे वीज बिल आकारणी करावी किंव्हा योजनेचे बिल शासनाने भरावे,तालुक्यातील संस्था ज्यांनी बंद पाडल्या त्यांच्यावर कारवाई करून त्या संस्था सुरळीत चालू करून शेतकरी कामगारांना न्याय देऊन,मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या नोकरीसाठी एमआयडीसी नवीन मोठमोठे उद्योग आणण्याची माझा प्रयत्न असुन. मुळा कृषी धरण व विद्यापीठ प्रकल्प स्थापन होऊन ५० ते ६० वर्षे झालीत,त्या एक प्रकल्प ग्रस्तांच्या नावावर किमान दोन व्यक्तींना नोकरी मिळऊन देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत,
अनेक गावात वाडी वस्तीसह शेतात जाण्यासाठी खडीकरण मुरमीकरण रस्ते, करून शेती व्यवसाय करण्यासाठी लागणारे डिझेल,पेट्रोल,रासायनिक खते,पशुखाद्य,कृषी औषधे यांच्या किमतीत नियंत्रणात आणुन ऊस,कांदा,सोयाबीन,गहु,व इतर मालाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा देऊन शेतीला जोडधंदा असलेला दूधाला कृत्रिम भेसळीमुळे भाव नाही त्या भेसळ खोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्फत कडक कारवाई करून ख-या दुधाला किमान ६० रुपये लिटर भाव मिळऊन देणार,शासनाने शेती पंपाला मोफत वीज कबुल केली,परंतु लाखोंचे थकीत बिले तसेच ठेवले ते नील करून देऊन दिवसा विज पुरवठा देऊन,सध्या दिवसा ढवळ्या बिबट्यासारखे वन्य प्राणी कुत्र्या मांजरा प्रमाणे मोकाट फिरत आहेत. त्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, शेतकरी वर्ग कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेला असताना त्याला विना अट सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना शासन त्यामध्ये अनेक जाचक अटी लावत आहे,शहरी व ग्रामीण भागातील घरकुलांना समान व किमान पाच लाख रुपये अनुदान देणे गरजेचे आहे,सरकारने भोगवटादार जागेमध्ये घरकुल बांधण्यास बंदी घातल्यामुळे गोरगरीबांना घरकुल योजना मिळत नाही,भोगावटदार जागा स्वमालकीच्या करून गोरगरीबांना घरकुल योजना सुरू करून,ज्या गावांतील गोरगरीबांना राहण्यासाठी जागा नसेल त्या गावांना शासनाकडून गावठाण वाढीसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देईल,वृद्ध व दिव्यांग निराधार व्यक्तींना किमान ६ हजार महिना मानधन मिळवून देण्याचे माझे प्रयत्न आहे.धरण उशाला व कोरड घशाला या म्हणीप्रमाणे नियोजना अभावी मुळा उजवा व डावा कालवा,भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणी मतदार संघातील शेतकऱ्यांना मिळत नाही, त्याचेही योग्य नियोजन करणे गरजेचे आहे,सर्व समाजांतील घटकांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची गरज असताना या प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी राजकीय पुढारी जाती धर्माच्या नावाखाली लोकांची मते मिळवतात व मतदार या गोष्टीला बळी पडतात हे फार मोठे दुर्दैवी आहे, राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील हे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे माझे अनेक दिवसापासूनचे प्रयत्न आहेत,हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची कोणी उमेदवार लेखी हमी देत असेल तर त्याला मी माझा पाठिंबा देईल असे असे मत अपक्ष उमेदवार सुर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे