कल्पेश ठाकूर, अरविंद गुरव हे कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित
दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे रंगला कोकण कट्टाचा "कोकण सन्मान" सोहळा
कल्पेश ठाकूर, अरविंद गुरव हे कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित
दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे रंगला कोकण कट्टाचा “कोकण सन्मान” सोहळा
भाजप आमदार संजय उपाध्याय व सिने अभिनेत्यांची उपस्थिती
अलिबाग / राजेश बाष्टे
समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थाईक होऊन मागील २५ वर्षांपूर्वी “कोकण कट्टा” या सेवाभावी संस्थेचे बिज रोवणाऱ्या संस्थेतर्फे आज विलेपार्ले मुंबई येथील पंडित दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई गोवा महामार्गावरील अपघात ग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर, पत्रकार अरविंद गुरवसह पाच जणांना कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बोरीवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय, कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर मेढेकर, सिने अभिनेता दिगंबर नाईक, दिलीप मुळे, संदीप दळवी, कोकण कट्टाचे अध्यक्ष अजित पितळे, गायक सुदेश भोसळे, श्रीकांत नारायण, नितीन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले की, कोकण कट्टा चे २५ वर्षात रोपाच रूपांतर वटवृक्षात झाले आहे. ही संस्था गेली २५ वर्षे पार्ले, बोरीवली, मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे समाजिक चळवळ राबवून करत आहे. गरीब, दुर्बल आणि अनाथ घटकांना नेहमीच मदतीचा हात ते देत असतात.
यावेळी झालेल्या कोकण सन्मान सोहळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे मदतगार, पेणचे देवदूत कल्पेश ठाकूर, रायगडचे पत्रकार अरविंद गुरव, मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे, अथर्व ग्रुपचे उद्योजक सचिन गुंजाळ, दंतचिकित्सक डॉ.रोहित कर्णिक. सिने अभिनेते दिगंबर नाईक, करुणेश्वर वृद्धाश्रमाचे समाजेवक इश्वर ढोरे यांना मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व परशुरामाची मूर्ती देऊन कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्या “सुरश्री” गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.