Breaking
ब्रेकिंग

सडे येथे कापूस पीक शिवारफेरी व शेतकरी मेळावा संपन्न*

0 8 6 5 1 0

*सडे येथे कापूस पीक शिवारफेरी व शेतकरी मेळावा संपन्न*

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या कापूस सुधार प्रकल्पाच्या वतीने राहुरी तालुक्यातील सडे येथे प्रगतशील शेतकरी श्री. माधव ढमढेरे यांच्या शेतावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल होते. याप्रसंगी भुईमूग पैदासकार डॉ. डी. व्ही. देशमुख, सहाय्यक कापूस कृषीविद्यावेत्ता प्रा. पांडुरंग देशमुख, कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. भाऊसाहेब पवार, सडे गावचे ग्रामसेवक डॉ. अनंत इंगळे, मंडल कृषी अधिकारी श्री. आर. बी. मिसाळ व कृषी पर्यवेक्षक श्री. आशुतोष ढुमणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवन कुलवाल यांनी कापूस पीक व्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठीची उपाययोजना तसेच कापूस पिकाचे महत्त्व, शेंडा खुडणे, गळफांदी काढणे आणि कापूस पिकाचे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. नंदकुमार भुते यांनी कापूस पिकावर येणार्या कीड व रोग आणि त्यामुळे होणारे नुकसान तसेच पीक संरक्षणाबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. भाऊसाहेब पवार यांनी कापूस पिकाची पातेगळ व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. यावेळी खरीप हंगामातील कापूस पिकाची आद्यरेखा प्रात्यक्षिक पाहणी व शिवारफेरी श्री. संभाजीराव धोंडे, श्री. प्रभाकर पानसंबळ, श्री. सतीश धोंडे व श्री. बाजीराव धोंडे यांच्या शेतावर घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नानासाहेब मरकड यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा डावरे यांनी केले. सदर शेतकरी मेळावा व शिवार फेरी या कार्यक्रमाचे नियोजन श्री. गणेश धोंडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे