Breaking
ब्रेकिंग

पॅरालिंपिकपटू दीपा मलिक नगरचा अभिमान : डॉ. उद्धव शिंदे

स्नेहबंधतर्फे दीपा मलिक यांचा सत्कार...

0 3 9 0 4 0

पॅरालिंपिकपटू दीपा मलिक नगरचा अभिमान : डॉ. उद्धव शिंदे

स्नेहबंधतर्फे दीपा मलिक यांचा सत्कार…

एस डब्ल्यु न्यूज / रिपोर्ट

अहिल्यानगर |   रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत देशाला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या व खेलरत्न पुरस्काराच्या मानकरी दीपा मलिक या अहिल्यानगरचा अभिमान आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. दीपा मलिक या त्यांचे ब्रिंग इट ऑन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त शहरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा डॉ. शिंदे यांनी सत्कार  केला.
डॉ. शिंदे म्हणाले, दीपा मलिक यांनी दिव्यांगांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्यांच्या क्रीडा वाटचालीची सुरुवात नगरमधून झाली आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकच्या ५६ वर्षांच्या इतिहासात पदक जिंकणारी दीपा या भारताची पहिल्या महिला खेळाडू ठरल्या. त्यांनी गोळाफेकीत (एफ-५६) ४.६१ मीटरच्या अंतरावर गोळा फेकून पदक आपल्या नावे केले. एफ-५३ अशा गटात असे खेळाडू सहभागी होतात, ज्यांच्या हातात गोळा फेकण्याचे पूर्ण बळ असते मात्र, बोटे दुबळी असतात. शिवाय शरीराचा कमरेखालचा भागही दुबळा असतो. दीपा मलिक याच गटातील खेळाडू आहे. दीपा मलिक यांचे कुटुंब २०१२ पर्यंत अहिल्यानगरमध्ये वास्तव्यास होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे