दुष्काळामुळे सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा – {अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी} प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांची मागणी*

*दुष्काळामुळे सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा – {अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी} प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांची मागणी*
अहिल्यानगर, दि. १३ ऑक्टोबर – जिल्ह्यात यंदा अत्यंत अल्प पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस ही पिके करपून गेली आहेत. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन-तीन किमी पायपीट करावी लागत आहे.
दुष्काळाचा सर्वात मोठा फटका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शेतीत उत्पन्नच नसल्याने शेतकऱ्यांकडे मुलांची फी भरण्यासाठी पैसा नाही. अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या मार्गावर आहेत.
या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे शासनाकडे लवकरच मागणी करणार असल्याचे समजते.
अहिल्यानगर जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व शाळा, महाविद्यालये व कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी.
प्रा ज्ञानेश्वर बनसोडे, “लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे लेखी मागणी करणारआहेत.. श्याशनाने विद्यार्थी फी माफी संदर्भात योग्य तो निर्णय नाही घेतला विविध प्रकारच्या सामाजिक संघटनेमार्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी श्याशनाला भाग पाडले जाईल या मुद्द्यावर श्री ज्ञानेश्वर बनसोडे सर ठाम आहेत.
—



