संशोधक सौ. वासंती दुर्गाडे यांना विशेष नैपुण्यासह एम.एड. पदवी प्रदान
संशोधक सौ. वासंती दुर्गाडे यांना विशेष नैपुण्यासह एम.एड. पदवी प्रदान
सुनिल ज्ञानदेव भोसले ९१४६२४१९५६ पुणे
प्रसिद्ध लेखिका, कवयित्री व मांडकी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. वासंती नितीन दुर्गाडे यांनी शैक्षणिक वर्ष 2023-2025 मध्ये एम.एड्. पदवी विशेष नैपुण्यासह संपादन केली आहे. त्यांनी “विद्यार्थी वक्तृत्व कौशल्य विकसनासाठी कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर लघु संशोधन पूर्ण करून ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे सादर केले होते.
या संशोधनाचा लाभ विद्यार्थ्यांना निश्चितच होणार असून भविष्यात दर्जेदार, आत्मविश्वासू व प्रभावी वक्ते निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या संशोधन कार्यास प्रा. डॉ. बोराटे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. सौ. वासंती दुर्गाडे यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.



