Breaking
ब्रेकिंग

जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0 3 9 0 2 0

जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून एलसीबी ला एमआयडिसीचे संदीप पाटील यांची तर एलसीबी चे बबन आव्हाड यांची एमआयडीसी पो स्टे ला बदली झाली आहे.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी १४ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग ची अदलाबदल केली आहे. त्यात चोपडा ग्रामीण च्या कावेरी कमलाकर यांची शनीपेठ जळगाव तर शनीपेठ चे रंगनाथ धारबळे यांची यावल , यावलचे प्रदीप ठाकूर जिल्हापेठ , पहुर चे पो नि सचिन सानप याना पारोळा तर पारोळ्याचे सुनील पवार यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोनि दत्तात्रय निकम यांना अमळनेर येथेच कायम करण्यात आले आहे. सपोनि प्रमोद कठोरे (आगुशा) याना पहुर चे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर वरणगावचे सपोनि जनार्दन खंडेराव यावल , भुसावळ बाजारपेठ चे सपोनि अमितकुमार बागुल याना वरणगाव चे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. पिंपळगाव हरेश्वर चे सपोनि प्रकाश काळे यांची जळगाव शहर , तर तेथील कल्याणी वर्मा पिंपळगाव हरेश्वर ला आणि पाचोऱ्याचे सपोनि सोपं गोरे यांची एलसीबी ला बदली झाली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे