Breaking
ब्रेकिंग

महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी ओढून नेली

0 3 9 0 3 0
  1. महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी ओढून नेली

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : दूध घ्यायला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून दोन अज्ञात मोटरसायकल  स्वारांनी दीड तोळ्याची सोनसाखळी चोरून  नेल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.
         अल्काबाई सुभाष लोहार वय ५९ रा प्रताप मिल कंपाऊंड ही महिला सायंकाळी  दूध घेण्यासाठी मंगलमूर्ती चौकात गेली होती. घराकडे परतत असता दोन मोटरसायकलस्वार तिच्या घराकडून जोरात येत त्यांनी तिच्या गळ्यातून ७० हजार रुपये किमतीची १४.५ ग्राम सोन्याची चेन ओढून ते गावातील पेट्रोलपंपाकडे पळून गेले. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे