Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फळाफुलापासून रंग निर्मितीमध्ये रंगले विद्यार्थी*

0 7 6 9 4 3

*सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फळाफुलापासून रंग निर्मितीमध्ये रंगले विद्यार्थी*

राहुरी तालुका जावेद शेख

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेमार्फत नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पालक या भाजीपासून हिरवा रंग, पळसाच्या फुलापासून गुलाबी रंग बीटा पासून जांभळा रंग झेंडूच्या फुलापासून लाल रंग जास्वंदीच्या फुलापासून गुलाबी रंग अशे विविध रंग तयार केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण तुपविहीरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की रासायनिक रंगात असणाऱ्या विविध रासायनिक घटकामुळे आपली त्वचा डोळे व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. डोळे चुरचुरणे त्वचेला खाज येणे, घशामध्ये खवखव यासारखे आजार या रासायनिक रंगामुळे होतात. रासायनिक रंग खेळल्याने दरवर्षी अनेकांना रासायनिक रंगाची बाधा होते. काळ्या रंगातील ऑक्साईडमुळे मूत्राशयात बिघाड होतो तसेच रंगात ॲल्युमिनियम ब्रोमाइड हे त्वचेला फारच घातक असते त्यामुळे कॅन्सर सारखा भयंकर आजार यामुळे होतो.
मात्र नैसर्गिक रंगाने कोणतीही बाधा होत नाही विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. बाळासाहेब डोंगरे सर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की नैसर्गिक रंग निर्मिती करूनच मुलांनी रंगपंचमी साजरी करावी. वसंत ऋतूची चाहूल लागलेली असताना येणारा हा सण खरा आनंद घेऊन येतो. निसर्गाच्या हातात हात घालून रंग खेळण्यात वेगळाच आनंद असतो. इयत्ता नववी मधील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध फुलापासून आणि भाज्या पासून रंग बनवून सादरीकरण केले. हरित सेनेचे विद्यार्थी कुमारी शिवानी शिंदे,भूमि खिलारे,समृद्धी चौरसिया,श्रावणी लांबे,श्रावणी खरमाळे,श्रावणी थोरात,तनिष्का शेडगे,कार्तिकी शेटे,सृष्टी सोनवणे,संस्कृती भावसार,सायली कांबळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कु.समृद्धी चौरसिया हिने सूत्रसंचालन केले तर तुकाराम जाधव सर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. अशा पद्धतीने विद्यालयांमध्ये नैसर्गिक रंगनिर्मितीची कार्यशाळा पार पडली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे