गुंडेगाव शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना.
मुख्याध्यापक निकम यांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाचे केले स्वागत..*
*गुंडेगाव शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना..*
मुख्याध्यापक निकम यांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाचे केले स्वागत..

वाळकी / प्रतिनिधी : दादा आगळे
अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव येथील शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली असून.राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका,खासगी अनुदानित,विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते.तसा शासन निर्णय शिक्षण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला.त्यानुसार गुंडेगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक उत्तम निकम यांनी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची संघ समिती स्थापन केली आहे.या संघामार्फत विद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात सहभागी करून विद्यालयाची प्रगती साधणे हा आहे.
माजी विद्यार्थी संघ स्थापन करत असताना माजी विद्यार्थी मेळावे,स्नेहसंमेलने आयोजित करणे तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा शासन उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देणार आहे.यामध्ये शाळांनी नियोजित मेळावे,स्नेहसंमेलन आयोजनासाठी आवश्यक खर्चाची प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदान इतर निधीतून करावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थी संघ समितीची रचना ही माजी विद्यार्थी संघासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी/ विद्यार्थी असेल तर सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक असतील तसेच सदस्य हे स्थानिक व नोकरी,उद्योग,व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी असणार आहे.शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक,अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक हे सल्लागार म्हणून काम पहाणार आहेत.संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणी करून संघाचे सभासदत्व घेऊ शकतो. शासनाने पुरविलेल्या ऑनलाइन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी ठेवण्यात येणार आहे.माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात येणार आहे.माजी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान 2 बैठका घेण्यात येतील आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्यांच्या सोयीनुसार सर्वसंमतीने ऑनलाइन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येईल असे न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव येथील मुख्याध्यापक उत्तम निकम यांनी सांगितले आहे.


