खबरदार रोडरोमिओंनो……अन्यथा याद राखाल अशी कारवाई करू – – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

खबरदार रोडरोमिओंनो……अन्यथा याद राखाल अशी कारवाई करू – – पोलीस निरीक्षक विनोद घुगे
करमाळा / विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा शहर व तालुक्यात सध्या परिक्षांचे दिवस सुरू असून, अशा वेळेस रोडरोमिओ जर निदर्शनास आले तर त्यावेळी कोणताही विचार न करता प्रथम त्याचेवर कायदेशीर कारवाई करून रोमिओगिरी थंड करू असा सज्जड इशारा रोडरोमिओंना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे.
विद्यार्थी असो अगर विद्यार्थिनी असो सद्यस्थितीत ते परिक्षार्थी असल्याने त्यावर त्यांचे भविष्य, त्यांचे आईवडिलांचे स्वप्न अवलंबून आहे.अशावेळी या विद्यार्थ्यांच्या मनावर अशा प्रेमखोरवृत्तीची सावली देखील पडली नाही पाहीजे, यामुळे संबंधीत परिक्षार्थीच्या मनावर वेगळाच परिणाम होतो, जेणेकरून त्याला टक्केवारी कमी मिळु शकते, म्हणून परिक्षार्थीचे मनोधैर्य वाढावे व त्यास अशा रोडरोमिओचा कोणताही त्रास होवू नये यासाठी प्रत्येक परिक्षा केंद्रावर पोलीस व होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त ठेवलेला आहे.
मी ज्या गावात बदलून जातो त्या गावाला मी माझा परिवार समजतो. आणि त्या परिवाराच्य प्रगतीत, काय हातभार लावता येईल तेवढे मी करण्याचा प्रयत्न करतो, करमाळा येथील रहीवाशी व गाव खरोखरच खुप शांत व चांगले गाव आहे. येथे वाहतूकीचा असलेला प्रश्न सोडविणेसाठी मी प्रयत्नशील आहे.त्याचेच द्योतक म्हणून रिक्षाचालकांना खाकी ड्रैस सक्तीचा करून त्यांचे वाहन व्यवस्थित उभे करण्याच्या सुचना दिलेल् आहेत. तसेच विनालायसन, ट्रिपलशिट, फास्ट गाडी चालविणरे, मद्यप्राशन करून वाहन चालवणारे यांचेवर आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. जेणेकरून नागरिकांना अशा वाहनांचा व वाहनचालकांचा कोणताही त्रास होता कामा नये
असे अनेकवेळा ऐकण्यात आलेले आहे की, मुलींची संख्या कमी असल्याने,मुलांची लग्नच होईनात त्यांचे वय वाढत चाललेल आहे, तर काहींना कामधंदाच नाही असे बहाद्दर तर खुप आहेत असे वाचण्यातही येत असते. परंतु लग्न होण्यासाठी प्रेमी होण्याच, दाखवण्याची शक्कल लढवून अनेक मुलींचे नुकसान करणारे भुरटे हिरो सर्वत्र वाढत आहेत, भले मग शर्ट पॅन्ट गावातीलच कोणाची तरी मागुन आणुन इथे शाळकरी मुलींच्या पाठीमागे फिरून हिरो बनण्याच प्रयत्न करतात असे भिकारभाजणे रोडरोमिओ जर इथे निदर्शनास आले तर त्यांची गय न करता त्यांचेवर कारवाई करेन!त्यांना शिक्षण घेवु द्या विनाकारण त्यांना भरकटवू नका….विनोद घुगे, पोलीस निरीक्षक करमाळा.