पिपंळनेर शहरात शिवसेनेतर्फे २१ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन*

*पिपंळनेर शहरात शिवसेनेतर्फे २१ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
पिंपळनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करावयाचे असून त्यानुसार पिंपळनेर शहरातही शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन २१ रोजी करण्याचे योजिले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या स्मरणार्थ शिवसेनेतर्फे दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ठिक ९.०० वाजता राममंदिर पिंपळनेर येथुन भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर तिरंगा रॅलीत चारचाकी वाहनावर भारत मातेची एक प्रतिमा, मोटारसायकलवर तिरंगा झेंडा लावून रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते गायिले जाणार आहेत.
सदर तिरंगा रॅलीमध्ये सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक आमदार सौ. मंजुळा तुळशीराम गावित व शिवसेना जल्हा प्रमुख धुळे, डाॅ. तुळशीराम गावित व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.