Breaking
ब्रेकिंग

श्री साई प्रतिष्ठानच्या उत्सवात अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधन- महंत उद्धव महाराज मंडलिक

0 8 6 5 0 9

श्री साई प्रतिष्ठानच्या उत्सवात अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधन- महंत उद्धव महाराज मंडलिक

देवळाली प्रवरातील श्रीराम कथेची काल्याचे कीर्तनाने सांगता

राहुरी तालुका जावेद शेख

कथा, कीर्तन, प्रवचन व व्याख्यान या माध्यमांतून समाजप्रबोधनाची आज नितांत गरज असून श्री साई प्रतिष्ठान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजात संस्कार व जनजागृतीचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांच्यावतीने वार्षिक श्री साई उत्सव तपपूर्ती व श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विदर्भरत्न रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून बाजार तळ परिसरात भव्य श्रीराम कथा पार पडली.काल सायंकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता झाली प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांमध्ये संस्कार, नैतिकता व अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याची गरज निर्माण झाली असून, अशा धार्मिक उपक्रमांतून समाजात सकारात्मक विचारांची जपणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री साई प्रतिष्ठान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजात संस्कार, जनजागृती आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सद्भावना वाढीस लागते, असेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे