Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर

आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी

0 3 9 0 3 6

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर

आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले सोमवार दि.2 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.दि.2 जून ते 11 जून पर्यंत 9 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर ना.रामदास आठवले सोमवारी पहाटे 2 वाजता रवाना होणार आहेत.

अमेरिकेत आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ना.रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात दि.2 जून रोजी आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हल आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर अमेरिकेतील विविध कार्यक्रमांना ना.आठवले उपस्थित राहणार आहेत.अमेरिकेतील पत्रकार विचारवंत,उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची भेट ना.रामदास आठवले घेणार आहेत.दि.11 जून रोजी ना.रामदास आठवले भारतात परतणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे