स्व.अजित दादांना दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण
स्व.अजित दादांना दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण
नगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे ६ वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला अजित पवारांचा सह ईतर सहकारी अंगरक्षकसह विमान दुर्घटनेत दुखत निधन झाल्याने सामान्य माणसाला आज दादा आपल्यात नाहीत हे मान्य करण्यास मन तयार नाही पण सत्य परिस्थिती आज दादा आपल्यात नाहीत हे खुप मोठं दुःख आहे.नगर तालुक्यातील दहिगाव पंचक्रोशीतील सर्व पक्षीय व दहिगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री राम मंदिर सभामंडपात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी साकत गावचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित दादांना भेटल्याचा आठवणी सांगितल्या, तसेच शरद कार्ले यांनी देखील दादा राजकीय कार्यक्रमात उपस्थित असताना नगरचे मंडळी ते आपल्या चाणाक्ष नजरेतून बरोबर ओळखत असे काय काम आणलं ते आधी मग ईतर विषय हा त्यांचा स्वभाव काम मार्गी लावण्यासाठी ते अधिकारी वर्ग कडे नेहमी आग्रही असायचे हा त्यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरात परिचित झाला होता. महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री त्यांनी अंत्यंत विकासाचे काम झपाट्याने मार्गी लावली पण अजित दादा मुख्यमंत्री होण्याचे जे स्वप्न होते ते अपुर्ण राहिले जर अजित पवार हे महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर एक टर्म त्यांना कार्यकाळ लाभला असतात तर त्यांनी शेतकऱ्यांना खर्या अर्थाने मुख्यमंत्री शेतकरी साठी काय करू शकतो हे देशाल दाखवून दिले असते. अशा आज सामान्य माणसाच्या भावना आहेत. अजित दादा राजकीय सामाजिक कार्यात सक्रिय अग्रेसर नाव राहिले विरोधक देखील कामांच माणुस म्हणून मान्य करतात विकासाच्या मुद्द्यांवर दादा जोर नेहमीच असायचा अनेक गोष्टींना उजाळा देण्यात आला
या वेळी अँड पोपट म्हस्के,ईजि बाबासाहेब बनकर, श्री राम ट्रस्ट अध्यक्ष शिवा म्हस्के, नाना गायकवाड, शाळा मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, नाईक सर, कारभारी गांगर्डे,मदन गांगडेॅ,सुदाम बडगे, मोहन निमसे,पोपोट पोटरे,राजु गुंड, विनायक वाघ,त्रृषीकेन आन्हाड, महेश म्हस्के सुनील म्हस्के, संभाजी म्हस्के, गोरख म्हस्के, तात्याभाऊ म्हस्के,आसाराम वाघ, अशोक जावळे आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते .


