Breaking
ब्रेकिंग

उद्या 20 मंत्री शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती

0 3 9 0 6 1

उद्या 20 मंत्री शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती

अमळनेर प्रतिनधी :-  पंकज पाटील

मुंबई :- राज्याच्या मंत्रिमंडळात मागील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आता उद्या मंगळवारी दि. २६ रोजी पहिल्या टप्प्यात तिन्ही पक्षाचे एकूण २० मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, भरत गोगावले किंवा तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात असे एकूण २० मंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे