भारतीय जनता पार्टी, अमळनेर विधानसभेतील चार मंडल अध्यक्षांची निवड जाहीर

भारतीय जनता पार्टी, अमळनेर विधानसभेतील चार मंडल अध्यक्षांची निवड जाहीर
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर, दि. २१ एप्रिल २०२५ –भारतीय जनता पार्टीच्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक दृष्ट्या चार मंडळ अध्यक्षांची निवड नुकतीच पार पडली.
अमळनेर शहर मंडल निवडणूक अधिकारी कृतिकाताई आफ्रे,निलेश भाऊ परदेशी,जानवे मंडल निवडणूक अधिकारी सुरेंद्रभाऊ बोहरा,पातोंडा मंडल निवडणूक अधिकारी एस आर पाटील,भिका भाऊ कोळी बहादरपूर मंडल निवडणूक अधिकारी संजय भाऊ महाजन, यांनी निवडणूक प्रमुख म्हणून यांनी काम पाहिले त्यानुसार मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली.
1.जानवे मंडल अध्यक्ष – श्री. जिजाबराव आसाराम पाटील
2.पातोंडा मंडल अध्यक्ष – श्री. राहुल किशोर पाटील
3.अमळनेर शहर अध्यक्ष – श्री. योगेश गोविंदा महाजन
4.बहादरपूर मंडल अध्यक्ष – श्री. समाधान पाटील.
या निवडीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जिल्ह्याचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय भाऊ चौधरी, संघटन मंत्री रवीजी अनासपुरे,खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश दादा चव्हाण,आमदार राजू मामा भोळे, पश्चिम जिल्हा निवडणूक प्रमुख नंदू भाऊ महाजन, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी शुभेच्छा दिल्या…