Breaking
ब्रेकिंग

पावसामुळे गुंडेगावच्या प्राचीन शिव मंदिरात पाणी; गावाला पाण्याचा वेढा…

0 7 9 9 5 4

पावसामुळे गुंडेगावच्या प्राचीन शिव मंदिरात पाणी; गावाला पाण्याचा वेढा…

वाळकी /  प्रतिनिधी : दादा आगळे

गुंडेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साठलं आहे. भगवान शंकराला जलाभिषेक झाला आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.पावसामुळे मंदिर गाभारा पाण्यात भरणे यामागे मुसळधार पाऊस, नद्यांचे वाढलेली पाण्याची पातळी ही कारणे असून धावडेवाडी,चौधरवाडी,कुताळमळा, हराळ मळा या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने गुंडेगावमधील मरगळनाथ मंदिर पाण्याने भरले गेले असून नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर गावाला देखील पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.सोमवारी आणि मंगळवारी गावाला तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे गुंडेगाव येथील प्रसिद्ध शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साठलं आहे. भगवान शंकराला जलाभिषेक झाला आहे असे नागरिकांकडून सांगितलं जातं आहे. दर्शन आणि पूजा सध्या बंद असून पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याच सांगितलं आहे.मोठा पाऊस झाल्याने शुढळा नदीचा प्रवाह वाढल्याने मंदिराचा गाभारा जलमय झाला आहे.

मरगळनाथ मंदिराचा इतिहास..

अहिल्या नगर पासून ३० किमी अंतरावर असणारे गुंडेगाव हे एक ऐतिहासिक गाव. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडल्याची आख्यायिका आहे. गावात गेल्या गेल्या उजव्या बाजूला पुरातन असे हेमाडपंथी मरगळनाथ महादेवाचे मंदिर आहे. सदर मंदिराचा इतिहास रामायण काळापासून असुन राम वनवासात असताना शुढळानदी तीरावरील या ठिकाणी आले असता या ठिकाणी आपल्या शरीरातील आलेली मरगळ घालवण्यासाठी शंकर महादेवाची भक्ती पुजा करण्यात आली तसेच महादेव पिंडीची स्थापना केली असता शरिरातील थकवा (मरगळ)नष्ट झाल्यामळे या देवस्थानाला मरगळनाथ संबोधले जाऊ लागले असा इतिहास पौराणिक ग्रंथामध्ये आहे.सध्या मंदिराला रंगरंगोटी केलेली असल्याने त्याचे मूळ पण लोप पावले आहे. मंदिरा समोर नंदी असून एक वीरगळ व भैरव मूर्ती उभी करून ठेवलेली आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर विविध पशु व पक्षी यांचे शिल्पांकन आहे. सभामंडपात देवकोष्टके असून त्यात गणेश व विष्णू मूर्ती आहेत..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे