Breaking
ब्रेकिंग

पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर ,सांगली व सिंधुदुर्ग या भागात अवकाळी पाऊसाची शक्यता

0 8 6 5 2 3

पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर ,सांगली व सिंधुदुर्ग या भागात अवकाळी पाऊसाची शक्यता

नाशिक :- सिन्नर जि. नाशिक राज्यात सर्वत्र मागील काही दिवस झाले 2026 दुष्काळी परिस्थिती राहील अश्या चर्चा ऐकायला मिळाल्या मात्र सध्या मार्च एप्रिल मध्ये राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला काही भागात विहरी भरतील असा पाऊस झाला आहे.  जागतिक तापमान वाढी मुळे हवे च्या पोकळ्या व पश्चिमे कडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्या मुळे हा पाऊस होत आहे
आज पासून हळूहळू पावसाची तीव्रता कमी होण्यास सुरवात होईल हवेचे जोड क्षेत्र सद्या मध्य महाराष्ट्र मध्ये अमरावती अकोला जालना संभाजी नगर अहिल्यानगर पुणे या भागावर स्थिर आहे आज या भागात पश्चिमे चे कोरडे वारे व दक्षिणे कढून बाष्प युक्त वारे एकत्र येत असल्यामुळे दव धुके मोठया प्रमाणात बघायला मिळाले
आज या भागात दुपार नंत्तर पावसाचा जोरदार बेल्ट निर्माण होईल हळूहळू हा बेल्ट पूर्वे ला मराठवाडा विभागात सरकत जाईल पश्चिमे ला नाशिक धुळे नंदुरबार ला काही भागातच मध्यम ते काही भागात जोरदार वादळी पाऊस होईल तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखिल पाऊस आज आणि उद्या काही भागात होईल 5/6 एप्रिल पाऊस वातावरण निवळेले. उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव नंदुरबार मराठवाडा पश्चिम महा. विदर्भ या भागात 10 एप्रिल नंत्तर तापमान 38° 40° पोहचेल मध्य महाराष्ट्र मध्ये नाशिक नगर पुणे 36° 37° च्या जवळ राहील 10ते 20 एप्रिल या काळात पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या भागात अवकाळी पाऊस होईल.
सध्या वातावरणात सतत अस्तिरता व तापमान वाढी मुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होत आहे एप्रिल च्या शेवटी देखिल अश्याच पोकळ्या तीव्र होतील व राज्यात अंतर्गत भागात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात जास्त पाऊस देतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे