ओंकारचे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल : डॉ. उद्धव शिंदे
'स्नेहबंध'तर्फे यूपीएससीत यशस्वी ओंकार खुंटाळे यांचा सन्मान
ओंकारचे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल : डॉ. उद्धव शिंदे
‘स्नेहबंध’तर्फे यूपीएससीत यशस्वी ओंकार खुंटाळे यांचा सन्मान
प्रतिनिधी : धिरज लांडगे
अहिल्यानगर – स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यूपीएससीची परीक्षा सर्वात अवघड मानली जाते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. पण ओंकार खुंटाळे यांचे विशेष कौतुक वाटते. त्यांनी पालकांच्या कष्टाचे चीज केले आहे. भविष्यातही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी नावलौकिक कमावावा. ओंकारचे हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देईल यात शंका नाही, असे प्रतिपादन स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून परीक्षा २०२४ मधून रँक ६७३ ने ‘भारतीय राजस्व सेवा’ मधे यश मिळवलेल्या ओंकार खुंटाळे यांचा स्नेहबंध फाऊंडेशनच्या वतीने डॉ. शिंदे यांनी शाल व रोप देऊन सन्मान केला. यावेळी त्यांचे बंधू मयूर खुंटाळे, उदय म्हस्के उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, सरकारी योजना प्रभावीपणे राबवा. समाजाची परीक्षेत सर्वसामान्यांना न्याय देऊन उत्तीर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन करून दिले.
यशाचा राजमार्ग दाखवला उलगडून
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या संवेदनशीलतेमुळे माझी परिस्थिती आणि ठामपणा तुम्ही सहज समजून घेतली. क्षणात मला रिप्लाय केलेला, कुठलेही टेन्शन न घेता दिवाळी आनंदात साजरी कर… सर तुमच्या सारख्या संवेदनशील पोलीस अधिकाऱ्यामुळे त्यावेळी एका पोराची चूक माफ झाली आणि तो पोरगा यूपीएससी करू शकला. हा प्रसंग माझ्या मनावर छाप सोडून गेलेला. तुमच्या सारखीच संवेदना, जाणीव घेऊन प्रशासनात वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळी माझ्या आयुष्याला योग्य दिशा दिल्याबद्दल आणि प्रशासनातील संवेदना काय असते ते दाखवल्यामुळेच आज मी आयुष्याच्या या वळणावर आलो आहे, असे ओंकार खुंटाळे यावेळी म्हणाले.



