विजयानंतर लगेच जनसेवेला सुरुवात; डॉ. उद्धव शिंदे यांच्याकडून अभिनंदन

विजयानंतर लगेच जनसेवेला सुरुवात; डॉ. उद्धव शिंदे यांच्याकडून अभिनंदन
‘स्नेहबंध’तर्फे आमदार अक्षय कर्डिले यांचा सन्मान
अहिल्यानगर : “विजयानंतर तत्काळ जनसेवेला सुरुवात करणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव दर्शवणारी बाब आहे,” असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या या विजयानंतर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन शाल व वृक्ष देत त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
निवडणुकीनंतर लगेचच जनसेवेसाठी कार्यरत होत असल्याचे सांगत अक्षय कर्डिले यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो ओळ :
राहुरी पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.


