Breaking
ब्रेकिंग

कपाट कारखानदार व मजुराचा प्रामाणिकपणा

0 4 3 3 3 1

कपाट कारखानदार व मजुराचा प्रामाणिकपणा

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : दुरुस्तीसाठी आलेल्या कपाटात दीड ते पावणे दोन लाख किमतीची चांदीची भांडी सापडूनही मोहात न पडता ती संबंधित मालकाला परत केल्याचा प्रामाणिकपणा कपाट कारखानदार उपाध्ये बंधू व त्यांच्याकडील मजुराने दाखवला आहे. न्यू प्लॉट भागात व्हाईट बिल्डिंग येथे प्रशांत उपाध्ये व नितीन उपाध्ये यांच्या मालकीचा ओम सतगुरु इंटरप्रायजेस नावाचा कारखाना असून याठिकाणी अमळनेर येथील कुंभार टेक भागातील अप्पा गुरव यांनी कपाट दुरुस्तीसाठी पाठवले होते,सदर कपाटाच्या खालील लॉकर मध्ये आजोबांनी ठेवलेली त्यांची वडिलोपार्जित चांदीची भांडी असल्याची कल्पना त्यांना देखील नव्हती,आणि ही भांडी खालील लॉकर मध्ये कोपऱ्यात असल्याने कपाट खाली करताना त्यांच्या निदर्शनास आले नाही. सदर कपाट नादुरुस्त झाल्याने दोन महिने त्यांच्या घराबाहेर पडले होते,त्यानंतर दोन तीन दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी उपाध्ये बंधू यांच्याकडे आले असता त्यांच्या कडील कारागीर रामदास दगडू चौधरी यांच्या ती निदर्शनास आली,यात चांदीचे भांडे,चांदीची फोटोफ्रेम,शिक्के आदी वस्तूंचा समावेश होता. त्यानी हे वैभव पाहून देखील मोहित न होता मालक उपाध्ये बंधू यांच्या निदर्शनास आणून दिले,या बंधूनी देखील प्रामाणिकपणे लागलीच कपाट मालक गुरव यांना बोलावून घेत सदर भांडी त्यांच्याकडे सुपूर्द केली,सदर प्रामाणिकपणा बद्दल त्यांनी कारागीर चौधरी यांना ५०० रुपये बक्षीस दिले. सदर वस्तु आर्थिक दृष्ट्या मौल्यवान असल्या तरी ते आमचे वडिलोपार्जित वैभव असल्याने याची किंमत आमच्यासाठी पैशापेक्षा मोठी असून ते आम्हाला परत मिळाल्याने याचा मोठा आनंद आम्हाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगत मालक व कारागीर सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे