महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा खुरासणी संशोधन प्रकल्प उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित

- *महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा खुरासणी संशोधन प्रकल्प उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित*
राहुरी तालुका जावेद शेख
भारतीय तेलबीया संशोधन संस्था, हैद्राबाद येथे ऑनलाईन पध्दतीने तेलबीया वार्षिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या इगतपूरी येथील विभागीय कृषि संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वीत खुरासणी (कारळा) संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. डी.के. यादव, प्रभारी अतिरिक्त महासंचालक (तेलबीया आणि कडधान्य पिके) डॉ. एस.के. झा, हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर.के. माथूर व प्रकल्प संचालक डॉ. आनंद विश्वकर्मा उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाने शेतकर्यांसाठी भरीव योगदान दिले आहे. या केंद्राने आत्तापर्यंत सह्याद्री, फुले कारळा, फुले वैतरणा आणि फुले कळसुबाई हे वाण आणि नऊ तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या आहेत. या प्रकल्पाने दिलेल्या या योगदानाची दखल घेवून सदरचा पुरस्कार मिळाल्याची माहिती प्रकल्पाचे खुरासणी पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. दिपक डामसे यांनी दिली. या प्रकल्पातील प्रवीण लोहकरे तसेच विभागीय कृषि संशोधन केंद्रातील डॉ. अविनाश कोलगे, डॉ. जयपाल चौरे, प्रा. सुरेश परदेशी, प्रा. रंगनाथ बागुल, मिलिंद पाटील, गणेश बहिरम, गजेंद्र फुलपगारे व अमीत वाघ या सर्वांचे सहकार्य मिळाले.


