Breaking
ब्रेकिंग

करमाळ्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध व्यायामपटू, विक्रमवीर महेश वैद्य गदर-3 चित्रपटामध्ये झळकणार; लाल मातीतून रुपेरी पडद्याकडे यशस्वी वाटचाल

0 8 9 6 9 9

करमाळ्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध व्यायामपटू, विक्रमवीर महेश वैद्य गदर-3 चित्रपटामध्ये झळकणार; लाल मातीतून रुपेरी पडद्याकडे यशस्वी वाटचाल

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०२/ करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध व्यायामपटू, फिटनेस कोच आणि ‘सशक्त व नशामुक्त भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर’ श्री. महेश बबनराव वैद्य यांना गदर-3′ या बहुचर्चित चित्रपटासाठी युवकांचे आयकॉन असणारे अभिनेते सनी देओल यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी महेश वैद्य यांना मिळाली आहे.

महेश वैद्य यांनी 1992 साली करमाळा येथील टाऊन हॉलमध्ये एकाच वेळी 7777 जोर (Pushups) मारून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या या असामान्य कामगिरीबद्दल तत्कालीन नगराध्यक्ष स्व. श्री. गिरधरदास देवी यांच्या शुभहस्ते त्यांना ‘करमाळा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांना समाज भूषण सह अनेक क्रीडा व सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील याच उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर महेश वैद्य यांनी मुंबईत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. मुंबईतील सिनेसृष्टीतील व उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे ते पर्सनल फिटनेस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

याचाच एक भाग म्हणून ‘गदर-एक प्रेमकथा’ आणि ‘गदर-2’ चे लेजेंडरी प्रसिद्ध लेखक श्री. शक्तिमान जी तलवार यांचे ते गेली 26 वर्षांपासून पर्सनल फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत. शक्तिमान जी तलवार सरांना सिनेजगतातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महेश वैद्य यांच्या सामाजिक कार्यातील तळमळ शक्तिमान सर जवळून पाहत आहेत. त्यांनी महेश वैद्य यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आणि एका हाडाच्या खेळाडूने तो सल्ला मनावर घेऊन अवघ्या 2 महिन्यात 9 किलो वजन कमी करून दाखवले.

शक्तिमान सरांनी महेश वैद्य यांच्या सामाजिक कार्याची तसेच जिद्द व चिकाटीची दखल घेत यांच्या आगामी ‘गदर-3’ या बहुचर्चित चित्रपटासाठी युवकांचे आयकॉन असणारे अभिनेते सनी देओल यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी महेश वैद्य यांना उपलब्ध करून दिली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला गदर-3 चे शूटिंग सुरू होणार असून त्यासाठी महेश वैद्य हे शक्तिमान सरांच्या मार्गदर्शनाखाली कसून व्यायाम करत आहेत.

लहानपणापासूनच सनी देओल व धर्मेंद्र यांचे जबरदस्त चाहते असलेल्या महेश वैद्य यांची गदरच्या माध्यमातूनच सनी देओल यांच्याशी ओळख झाली. महेश वैद्य यांना घडविण्यात शक्तिमान सरांचे मोलाचे योगदान आहे. महेश वैद्य यांच्या माध्यमातूनच समाजसेवक श्री. किसान कांबळे सर यांनाही शक्तिमान सरांना भेटण्याचा योग आला. शक्तिमानजी सारख्या व्यक्तिमत्वाची भेट व मार्गदर्शन हा एक विलक्षण योग असल्याची भावना किसन कांबळे सर यांनी व्यक्त केली.

महेश वैद्य हे सध्या ‘फिट इंडिया’ व ‘2047 पर्यंत सशक्त ग्राम व नशामुक्त ग्राम’ हे ध्येय घेऊन युवकांमध्ये कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला शक्तिमान जी तलवार सर, अभिनेते सनी देओल, सोनू सूद फाउंडेशनसह अनेक नामवंत सिनेकलाकारांचे सहकार्य लाभणार असून, त्यासाठी शक्तिमान सरांनी पुढाकार घेतला आहे. तसेच गेली 25 वर्षे रिलायन्सचे श्री. समीर साठा सर यांचे फिटनेस कोच आणि इंडियन मॉडेल स्कूलचे सर्वेसर्वा श्री. अमोल जोशी सर यांसारख्या दिग्गजांचे पाठबळ आपल्याला मिळत असल्याचे महेश वैद्य यांनी सांगितले.

आईची प्रेरणा, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, मित्रपरिवाराचे सहकार्य आणि गुरुवर्य श्री. विनोद कुमार गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक संघर्षांतून आज इथपर्यंत पोहोचलो, अशी भावना यावेळी महेश वैद्य यांनी व्यक्त केली. तसेच संस्थेचे सचिव श्री. संजय मोरे, महेश दोशी, बाळासाहेब होशिंग, ॲड. अजय दिवाण, अभिजीत कांबळे, डॉ. श्रीराम परदेशी, कळंब रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद शिंदे, नाग टिळक सर, दादासाहेब साठे, सुरेश कदम (माढा), रमेश खाडे सर, जीवन शेट्टी सर, प्रसाद कुलकर्णी, अनंतराव जोशी (सोलापूर) यांचेही मोलाचे सहकार्य महेश वैद्य यांना लाभले.

तसेच पत्रकार सूर्यकांत होनप, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार अलीम शेख, पत्रकार नासिर कबीर, पत्रकार सुनील सूर्यपुजारी इं. पत्रकारांचे देखील आपणास वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले असे महेश वैद्य यांनी यावेळी सांगितले.

महेश वैद्य हे लेट वनमला बबनराव वैद्य मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन करमाळा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आमचे परममित्र स्व. कै. दिनेश भाऊ सोरटे यांचे मला वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळाले अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.

महेश वैद्य यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्याचे नाव फिल्मसृष्टीत आणखीनच झळकणार आहे. तसेच त्यांच्या या कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून महेश वैद्य यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे