Breaking
ब्रेकिंग

चर्मकार विकास संघाचा संग्रामभैय्या जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

0 3 9 0 2 0

चर्मकार विकास संघाचा संग्रामभैय्या जगताप यांना बिनशर्त पाठिंबा

अहिल्यानगर :  आमदार संग्रामभैय्या जगताप अहिल्यानगर येथे विधानसभा सदस्य करिता तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहे.त्यांना आज चर्मकार विकास संघाचा संग्रामभैय्या जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे तसे पात्र देण्यात आले आहे .
पत्रकात म्हटले आहे आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे अहिल्यानगर शहरात चर्मकार समाजाचे संत रविदास विकास केंद्र १ एकर जागेत उभे राहत असतांना सुमारे नव्वद लाख रूपयांचा निधी व जागा बांधकामाकरिता उपलब्ध करून दिलेली आहे. चर्मकार समाजासाठी भरीव योगदान दिले आहे. चर्मकार समाजाच्या विकासात तसेच सुख दुःखात नेहमीच सहभागी राहतात. वेळोवेळी समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर ताबडतोब उपाय शोधून त्याचे निराकरण करतात.म्हणून चर्मकार विकास संघ अहिल्यानगरच्या वतीने आमदार संग्रामभैय्या जगताप यांना विधानसभा निवडणूकीमध्ये बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. मा. आ. संग्रामभैय्या आपणास भावी मंत्री पदाकरीता व राजकीय व सामाजिक कार्याकरिता शुभेच्छा .
पत्रकावर संजय खामकर,प्रदेशाध्यक्ष,विनोद कांबळे,शहर जिल्हाध्यक्ष यांच्या सह्या यावेळी दिनेश देवरे, संदीप सोनवणे ,स्वप्निल खामकर ,संतोष कांबळे अभिषेक कांबळे, रुपेश लोखंडे, दिलीप कांबळे ,दीपक खेडकर ,दगडू मामा पवार ,शंकर नाना सुडके ,किरण भाऊ दाभाडे ,भाऊ पुंड ,संदीप सुडके, स्वप्निल बोरुडे, अक्षय जाधव ,दादा पांडुळे आदी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे