Breaking
ब्रेकिंग

आडसूळ पॉलिटेक्निकचा ग्रीन क्लब अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम : निर्माल्यापासून खत निर्मिती

0 8 6 6 6 2

आडसूळ पॉलिटेक्निकचा ग्रीन क्लब अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम : निर्माल्यापासून खत निर्मिती

प्रतिनिधी : संवेद वायकर

चास येथील सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी “स्वच्छ भारत मिशन” अभियानांतर्गत “ग्रीन क्लब” च्या माध्यमातून गणपती उत्सवामध्ये निर्माण झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक यशस्वी पाऊल उचलले आहे. निर्माल्य म्हणजेच फुलं, हार, फळे, दुर्वा, आंब्याची पाने, विड्याची पाने व अन्य जैविक वस्तू होय. याच निर्माल्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांनी खत निर्मितीची कल्पना राबविली आहे.

या अभियानात पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गणेश मंडळे, घरातील गणपती यांचे गणेश उत्सवामध्ये तयार झालेले निर्माल्य गोळा करून त्यांचे वर्गीकरण केले व तसेच लोकांमध्ये या कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्याचेही काम केले. पाण्याचे नैसर्गिक स्रोत यांना बाधा पोहचू नये तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी गणेशोत्सव काळातील निर्माल्य नदीपात्रात टाकू नये, यासाठी महाविद्यालयाच्या “ग्रीन क्लब” ने जनजागृती मोहीम राबविली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्लास्टिक, थर्माकॉल व विघटन न होणाऱ्या वस्तू बाजूला ठेवून केवळ सेंद्रिय वस्तू जसे की फुले, हार, फळे, दुर्वा इत्यादी वस्तू खत निर्मितीसाठी वापरल्या. या निर्माल्याचे कुजवून कंपोस्ट पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते व काही दिवसानंतर हे कंपोस्ट खत महाविद्यालयातील झाडांसाठी खत म्हणून उपयुक्त ठरणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रमेश गडाख यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी २७ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर या कालावधीमध्ये शहरातील गणेश मंडळे, गणपती विसर्जन स्थळे यांना भेट देत ‘निर्माल्य’ गोळा केले. त्यांच्या प्रयत्नांना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांकडून सहकार्य लाभले.
संस्थेच्या सेक्रेटरी डॉ. लीना आडसूळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी निर्माण झाली पाहिजे या हेतूने हा उपक्रम विद्यार्थ्यांना खूप काही शिकून जाईल याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

ग्रीन क्लबचे समन्वयक म्हणून प्रा.जाधव एम. बी., प्रा. छाजेड आर. व्ही., प्रा. सोनवणे ए. ए., सिव्हिल, प्रा. केकाण यू. बी., प्रा. पाटोळे ए. एम. आणि प्रा. देशमुख एम. जे. यांनी काम पहिले.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध आडसूळ, सचिव डॉ. लिनाताई आडसूळ, डायरेक्टर श्री. कृष्णा आडसूळ, खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ, सदस्य कल्पना आडसूळ व रत्ना आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. रमेश एस गडाख, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील, डॉ. संभाजी पठारे, फार्मसी प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे डॉ. संदेश वायाळ, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे