जय मल्हार विद्यालयाचे नवीन इमारत बांधकामाला निधीची गरज
जय मल्हार विद्यालयाचे नवीन इमारत बांधकामाला निधीची गरज
प्रतिनिधी : महेश कांबळे
नगर-पिंपळगावरोठा ता.पारनेर येथील जय मल्हार विद्यालया शाळा नवीन इमारतीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करणेसाठी मोठ्या निधीची गरज आहे.असे जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव एड. पांडुरंग गायकवाड व मुख्याध्यापक यु.जी सुंबरे, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक,ग्रामस्थ,शिक्षक आणि कर्मचारी यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री पर्वात मेळावा आयोजित करून विद्यालयाची नवीन भव्य इमारत बांधण्याचा संकल्प सर्वांनी मिळून केला होता.त्यानुसार ऑगस्ट 2023 मध्ये प्रत्यक्ष इमारतीचे कामाला जमीन खोदण्याने सुरुवात झाली. सुरुवातीलाच जय मल्हार विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी स्वइच्छेने एक महिना पगाराची पूर्ण रक्कम रुपये 7.50 लक्ष रुपये देऊन देणगी व मदतीचा श्री गणेशा केला होता.त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन शाळा इमारत बांधकामासाठी निधी मिळणे कामी मोठे सहकार्य दिले.त्यामुळे नवीन इमारतीचे तळमजला, 1ला मजला, 2 रा मजला वीट बांधकाम व आतील प्लास्टर चे काम झाले आहे.एकूण 10345 चौरस फूट बांधकाम असून दुसरा मजला वीट बांधकाम प्लास्टर चे काम चालू आहे.
उर्वरित राहिलेली संपूर्ण इमारतीचे बाहेरील प्लास्टर,लादीकाम,रंगकाम,सॅनिटरी फिटिंग,इलेक्ट्रॉनिक फिटिंग,सोलर शेड, कंपाऊंड गेट,पाणी साठवून टाकी,प्लंबिंग इत्यादी कामासाठी मोठा निधीची रुपये 85 लाख ची गरज असल्याचे निवेदन जय मल्हार विद्यालय आणि जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था यांचे तर्फे माजी विद्यार्थी, पालक,देणगीदार, कंपनी, संस्था उद्योजक हितचिंतक इ.केले आहे.इच्छुक देणगीदारांना आयकर कलम 80जी खाली देणगीदार कर सवलत सुविधा लागू आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया संस्थेचे बचत खाते नंबर 5414747333 असून IFSC कोड CBIN0281860 या नंबर वर ऑनलाइन देणगी देता येईल.
जून 2026 पासून शाळा नवीन इमारतीमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. तरी नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाला जाण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी,पालक, देणगीदार,ग्रामस्थ, मुंबईकर,पुणेकर इत्यादींनी संस्थेला देणगी देऊन सहकार्य करावे असे निवेदन जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था जय मल्हार विद्यालय यांनी केले.



