Breaking
ब्रेकिंग

प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये” – महेश पाडेकर (कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, पुणे विभाग)*

शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा २८ एप्रिलपासून 'एल्गार'; राज्यभर 'कामबंद' आंदोलनाचा इशारा*

0 7 9 8 0 2

*​”प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये” – महेश पाडेकर (कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, पुणे विभाग)*

*शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा २८ एप्रिलपासून ‘एल्गार’; राज्यभर ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा*

*​प्रशासनाच्या हुकूमशाही धोरणाविरुद्ध कर्मचारी आक्रमक; ‘शिक्षक भारती’चा आंदोलनास सक्रिय पाठिंबा*

राहुरी तालुका जावेद शेख

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC & HSC Board) पुणे विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध आरपारची लढाई पुकारली आहे. सन १९९३ पासून सुरू असलेले बदली व पदोन्नतीचे निकष मोडीत काढण्याच्या प्रशासकीय निर्णयाच्या निषेधार्थ, मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ पासून कर्मचाऱ्यांनी ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला ‘शिक्षक भारती’ संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याने आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे. असे शिक्षक भारतीय संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर व जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, अहिल्यानगर तालुकाध्यक्ष साई थोरात यांनी सांगितले.
राज्य मंडळाची स्थापना १९६५ च्या अधिनियमान्वये झालेली असून ही एक स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे. कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात सन १९९३ मध्ये झालेल्या करारानुसार बदल्यांचे निकष ठरलेले होते. मात्र, माहे डिसेंबर २०२५ पासून प्रशासनाने कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता, हे निकष बदलून शासकीय बदल्यांचे नियम लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे स्थैर्य धोक्यात आले असून, प्रशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप कर्मचारी महासंघटना व बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समितीने केला आहे.
*​रिक्त पदांचा गंभीर प्रश्न*
पुणे विभागीय मंडळ कार्यालयात एकूण ५९१ मंजूर पदांपैकी तब्बल ३८६ कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असतानाही कर्मचाऱ्यांनी परीक्षा आणि निकालाची कामे वेळेत पूर्ण केली आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​शिक्षक भारतीचा पाठिंबा आणि इशारा
या आंदोलनास पाठिंबा देताना शिक्षक भारती संघटना, पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी म्हटले आहे की, “शिक्षण मंडळाचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने चर्चेचा मार्ग सोडून हुकूमशाही पद्धतीने नियम लादले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शिक्षक भारती कर्मचाऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरेल.”
​निकालावर परिणाम होण्याची शक्यता
दि. २८ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाने गांभीर्य न दाखवल्याने आता कर्मचाऱ्यांनी लेखणी खाली ठेवली आहे. यामुळे आगामी निकाल प्रक्रिया आणि बोर्डाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त आणि बोर्ड अध्यक्ष यांना निवेदने देण्यात आली असून, आता सर्व लक्ष राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. या बेमुदत आंदोलनासराज्य सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, रूपालीताई बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,प्रवीण काळे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,दिगंबर देसाई,सचिव वंदना जाधव,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप, आधी पदाधिकारी सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिला .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे